Ulhasnagar: ब्रॅण्डेड कंपनीची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ulhasnagar: ब्रॅण्डेड कंपनीची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक!

उल्हासनगरातून रेडीमेड कपड्यांचा लाखो रुपयांचा माल जप्त

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरात Ulhasnagar एका ब्रॅण्डेड कंपनीच्या शर्ट पॅन्टची हूबेहून नक्कल करून ग्राहकांना विक्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानात अँटी पायरसी सेलने Anti-piracy Cell धाड टाकली आहे .या धाडीत दुकानातून लाखोंचा हुबेहूब नक्कल केलेला शर्ट-पॅन्टचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

प्रसिद्ध सियाराम कंपनीचे कपडे;

कॅम्प नंबर 4 परिसरात एस. आर. डिझायनर स्टुडिओ कपड्यांचे दुकान आहे. या दुकानात सियाराम कंपनीचे शर्ट, पॅन्ट, सूट शिवून रेडिमेड मटेरियल विकले जात होते. यासाठी सियाराम कंपनीची कोणतीही परवानगी न घेता बाहेरून शर्ट, पॅन्ट पीस आणून त्यावर सियारामचा लोगो कपड्यांवर लावून तो जास्त किंमतीला विक्री केली जात आल्याची माहिती कंपनीला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अँटी पायरसी सेलने विठ्ठलवाडी पोलिसांच्या Vitthalwadi Police मदतीने दुकानावर धाड टाकली. या धाडीमध्ये दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचे सियाराम कंपनीचे लोगो असलेले शर्ट, पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. या सोबत सूट कव्हर, सियाराम कंपनीचे लोगोदेखील ताब्यात घेण्यात आला आहे.

कॉपीराईट्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल;

दुकानाच्यावरच रेडिमेड कपड्याचा कारखानाया प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दुकानचालक भीमाशंकर चिंचोळे याच्यावर कॉपीराईट्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले

Friday Horoscope : वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळेल; आजचा दिवस ठरणार ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT