दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली 'मुळशी पॅटर्न' प्रमाणे धिंड! SaamTvNews
मुंबई/पुणे

दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली 'मुळशी पॅटर्न' प्रमाणे धिंड!

उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांना वेग आला असून स्वतःला भाई म्हणवून घेणाऱ्या बदमाशांनी शहरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांना वेग आला असून स्वतःला भाई म्हणवून घेणाऱ्या बदमाशांनी शहरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री तीन गुंडाच्या टोळीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मारहाण केली. गुंडांनी घातलेला हैदोस CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर प्रकरणात मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण परिसरात स्वतःला दादा, भाई म्हणवून घेणाऱ्या गावगुंडांची दहशत वाढत चालली आहे.

हे देखील पहा :

रात्री दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून शहरातील गुरूमितसिंग आणि त्याच्या काही गुंडांनी भरवस्तीत धिंगाणा घालून काही जणांना मारहाण केल्याचा प्रकार अशोक-अनिल सिनेमागृहाच्या मागील परिसरात घडला होता. या गुंडांनी एवढ्यावरच न थांबता परिसरातील अनेक दुकानदारांना मारहाण करून त्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशोक-अनिल टॉकीजच्या मुख्य रस्त्यावर या बदमाशांचा हैदोस सुरू होता. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. गुरुमित सिंग लबाना, आयोलोसिंग लबाना आणि बॉबी सिंग लबाना यांना अटक करून पोलिसांनी त्यांची याच परिसरात हातात बेड्या घालून धिंड काढली. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घातला पाहिजे यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या गुंडांची धिंड काढली व गुन्हेगारांना आव्हान दिले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांना पो.नि. मधुकर कड यांनी कोणत्याही गुन्हेगाराची व गुंडाची खैर केली जाणार असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT