Ulhasnagar Crime Saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime : भयंकर! खेळता खेळता भाचीला धक्का दिला, जीवच गेला, नंतर मामाने नात्याची हद्द पार केली!

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये मुलीच्या मामानेच भाचीची हत्या करुन मृतदेह जाळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगरमध्ये धक्क्दायक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करुन मृतदेह जाळल्याची संतापजन घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगरमध्ये गुरुवारी ही घटना घडली आहे. ही हत्या मुलीच्या मामानेच केली असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मानाला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ प्रेमनगर टेकडी परिसरात ही घटना घडली आहे.तिची आई आणि दोन बहि‍णी येथे राहत होत्या. सोमवारी सकाळी खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला. मात्र, हा फटका खूप जोरात बसला. या फटक्यामुळे ती मुलगी ओट्यावर जोरात आदळली. यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूनंतर मामा खूप घाबरला. मुलीच्या मृतदेह त्यांनी लपवून ठेवला. बुधवारी मतदानाच्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडाझुडपात मृतदेह नेऊन तो जाळून टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केली.

गुरुवारी पोलिसांनी मुलीचा तपास करण्यास सुरुवात केली. मुलीची शोधाशोध केल्यानंतर मुलीचा मामा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला.मामानेही मुलीला शोधण्याचे नाटक केले. त्यानंतर ज्या ठिकाणी मुलीला जाळले होते. त्याचठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुलीला शोधण्यासाठी पाठवले.स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्यासाठी गेले.

यादरम्यान, रिक्षाचालकाला मुलीचा मृतदेह सापडल्याने त्यानं याबाबत माहिती पोलिसांना आणि मुलीच्या कुटुंबियांना दिली. मात्र, हा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला.

यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेतले. मुलीच्या मामाला आणि रिक्षाचालकाला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर मामाने स्वतः गुन्हा कबूल केला.मात्र, या हत्त्येचा कोणताही उद्देश नव्हता. अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला त्यात तिचे डोकं जोरात आदळले. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आपण घाबरले असून तिचा मृतदेह लपवला.

भाचीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपी मामाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजरं केलं असल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही माहिती दिली. तसंच मुलीसोबत कोणतेही कृत्य झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT