Ulhasnagar Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: चोरीसाठी नग्न होऊन आला, दुकानातील मोबाईल चोरले; जाता जाता तिथेच शौच करून गेला

Ulhasnagar Mobile Store Theft: उल्हासनगर कॅम्प ५ च्या गायकवाड पाडा परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्याने दुकानातच शौच केले त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Priya More

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमधील एका चोरीच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. एक चोरटा नग्न होऊन मोबाईलच्या दुकानात घुसला. त्याने मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरून नेली. संतापजनक बाब म्हणजे जाता जाता या चोरट्याने मोबाईलच्या दुकानातच टॉयलेट केली त्यानंतर तो तिथून निघून गेला. हा चोरटा दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उल्हासनगर कॅम्प ५ च्या गायकवाड पाडा परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याठिकाणी सुनील गुप्ता यांचे ओम साई राम कम्युनिकेशन हे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने दुकानाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे हा चोर संपूर्ण नग्न अवस्थेत होता. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत तो कैद झाला.

दुकानातील २ मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन हा चोरटा पसार झाला. जाताना या चोराने दुकानातच बसून शौच केले. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. सध्या या चोरीच्या घटनेची उल्हासनगरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलिस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-डोंबिवलीत बोगस शाळांचा भंडाफोड; अनधिकृत शाळांची यादी जाहीर

Maharashtra Live News Update : धुळ्यातील चाळीसगाव रोडवर अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पुरवठा विभागाचा छापा

Vijay Weds Rashmika: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा बार उडाला, उदयपूरमधील पहिला फोटो आला समोर

Viral Video: महिलांनी शोरूममधून चोरले अंडरगारमेंट्स, CCTV मध्ये कैद झाली घटना

Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा

SCROLL FOR NEXT