Ulhasnagar Man Killed Himself Saam Tv News
मुंबई/पुणे

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Ulhasnagar Man Killed Himself: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील गांधी रोडवरील लक्ष्मीनारायण पॅलेस इमारतीत एका व्यक्तीनं स्वत:ला पेटवून घेत आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट.

Bhagyashree Kamble

  • उल्हासनगरमधील सोसायटीच्या टेरेसवर विजयकुमार भोजवानी यांनी स्वत:ला पेटवून घेतलं.

  • ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्यांनी आत्महत्या केली.

  • टेरेसवर आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी धाव घेतली, पण शरीर जास्त भाजल्यामुळे मृत्यू झाला.

  • पोलिसांकडून आत्महत्येचे कारण शोधण्याचा तपास सुरू असून परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं आहे. सोसायटीतील लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी टेरेसवर धाव घेतली. त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

विजयकुमार भोजवानी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते कॅम्प नंबर पाचच्या गांधी रोड भागातील लक्ष्मीनारायण पॅलेस या इमारतीत राहत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास ते टेरेसवर गेले. बराच वेळ ते खाली आले नव्हते. सोबत त्यांनी ज्वलनशील पदार्था सोबत नेलं होतं. यानंतर त्यांनी स्वत:ला पेटवून घेतलं.

टेरेसवर कुणीतरी किंचाळत आणि आग लागल्याचं लक्षात येताच लोकांनी टेरेसच्या दिशेनं धाव घेतली. तसेच आग विझण्याचा अथक प्रयत्न केला. मात्र, आग वेळेत विझली नाही. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळावर एक कॅन आढळून आली. विजयकुमार यांना रूग्णालयात नेण्यात आले.

मात्र, विजयकुमार यांचा होरपळून मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूनंतर भोजवानी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

SCROLL FOR NEXT