उल्हासनगर मध्ये भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगर मध्ये भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप

आज उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा उल्हासनगर मधील सेना-भाजपा वाद उफाळून आला आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : आज उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा उल्हासनगर मधील सेना-भाजपा वाद उफाळून आला आहे. उल्हासनगर महानगरपालिका बाहेर आज भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना सात ते आठ शिवसैनिकांनी काळ फासले आणि चोप दिला.

हे देखील पहा -

या हल्ल्याबद्दल रामचंदानी यांनी म्हटलं की उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी हा हल्ला केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रारी करत होतो. याचा राग मनात धरून हा हल्ला चौधरी यांच्या माणसांनी केला आहे.

दरम्यान, प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या आरोपाबद्दल राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता त्यांनी अनधिकृत बांधकाम कोण करत आहे हे सर्वांना माहीत असून, प्रदीप हे सोशल मीडियावर शिवसेनेची अनेकदा बदनामी करत असतात. तसेच नारायण राणें यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आम्ही राणेंच्या पिळवली शोधतच होतो, तेव्हा महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांना रामचंदानी भेटले आणि त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलं आहे. असे, राजेंद्र चौधरी म्हणाले.

आता या मारहाण प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात प्रदीप रामचंदानी यांच्या फिर्यादीवरून सात आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT