जयंत पाटील आले अन् करेक्ट कार्यक्रम करुन गेले; 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ' रश्मी पुराणिक
मुंबई/पुणे

जयंत पाटील आले अन् करेक्ट कार्यक्रम करुन गेले; 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ'

हे सर्व नगरसेवक भाजपच्या चिन्हावर जिंकून आले होते

अजय दुधाने

उल्हासनगर - २६ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतली. गेल्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले उल्हासनगर पालिकेतील २२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

हे देखील पहा -

त्याआधी भाजपा नगरसेविका व पूर्व महापौर पंचम कलानी यांनी भाजपा नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर कलानी कुटुंबात कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपापासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते.

पंधरा दिवसांपूर्वी भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानीने चर्चा केली होती. याच वेळी आयलानी यांनी भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर उल्हासनगरमध्ये आता भाजपाला कलानी गटाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे एकूण ४० नगरसेवक आहेत त्यापैकी ओमी कलानी गटाचे २२ नगरसेवक आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

SCROLL FOR NEXT