Ulhas River Crosses Danger Level Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhas River Flood: उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, बदलापुरला पुराचा धोका; कर्जतकडे जाणारा महामार्ग पाण्याखाली

Ulhas River Crosses Danger Level: बदलापूरमधील अनेक परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. उल्हास नदीमुळे बदलापुरवरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

Priya More

ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. उल्हास नदी पात्राबाहेर आली असून नदीचे पाणी बदलापूर शहरामध्ये शिरले आहे. बदलापूरमधील अनेक परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. उल्हास नदीमुळे बदलापुरवरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

उल्हास नदीचे पाणी बदलापुरवरून कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर आल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. चामटोली गावाजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामटोली गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतकडे जाणारा हा राज्य महामार्ग बंद केला आहे.

काही वर्षांपूर्वी याच चामटोली गावाजवळ उल्हास नदीचं पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. आता पुन्हा एकदा चामटोली गावात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे त्या भयावह पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. अशातच रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब मार्गावरील दहिवली येथे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे.

उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरमधील सखल भागात जमा होऊ लागल्याने बदलापूर नगरपालिकेतर्फे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण - नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हासनदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. उल्हास नदीची पातळी वाढल्यास कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT