Uddhav Thackeray, nagar news saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray To Tour Farms : बळीराजाला आधार देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट बांधावर जाणार, जाणून घ्या आजचा दाैरा

शेतक-यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे शिर्डीत माध्यमांशी शेतीच्या सद्यस्थितीवर संवाद साधणार आहेत.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शुक्रवार) अहमदनगर (uddhav thackeray in nagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दाै-यात ठाकरे संगमनेर आणि राहाता तालुक्यातील दुष्काळी भागात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. (Maharashtra News)

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपाची पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे.

दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेत शिवारात भेट देऊन शेतक-यांकडून परिस्थितीची माहिती घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ठाकरे शिर्डीत माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

- उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा

सकाळी १०.४५ वा. काकडी ( शिर्डी ) विमानतळ येथे आगमन..

१) काकडी, ता. कोपरगाव परिसर पाहणी

२) वडझरी खुर्द, ता. संगमनेर परिसर पाहणी

३) तळेगाव, ता. संगमनेर परिसर पाहणी

४) केलवड, राऊतवस्ती, ता. राहाता परिसर पाहणी

५) कोरहाळे, ता. राहाता परिसर पाहणी (५ कि.मी.)

६) पुणतांबा परिसर पाहणी

दुपारी २.०० वा. पत्रकार परिषद - शासकीय विश्रामगृह, शिर्डी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: पूल नसल्याने गावकऱ्यांचा जीवाघेणा प्रवास, तुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून काढली वाट; पाहा VIDEO

Amruta Khanvilkar: 'जाळ अन् धूर...' अमृताच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ

Train Accident : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात; मालगाडी रुळावरून घसरली, VIDEO

Maharashtra Live News Update : बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीना विषबाधा

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

SCROLL FOR NEXT