Uddhav Thackeray In Kalyan Dombivli Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: 'शाखा पळवलीत, आमचं सरकार येऊ देत मग...', शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: डोंबिवलीची शाखा पळवली मुंबईची शाखा तोडली आपली सत्ता येऊ द्या, त्यांचे आता कंबरडेच मोडतो'', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत केले.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख, कल्याण

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde:

''मी व्यंगचित्रकाराचा मुलगा आहे, त्यामुळे चित्र कुठले रेखाटायचे, ते मला चांगले समजते. मी मोठ्या मनाचा नक्की आहे. मात्र तरीही गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही. डोंबिवलीची शाखा पळवली मुंबईची शाखा तोडली आपली सत्ता येऊ द्या, त्यांचे आता कंबरडेच मोडतो'', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत केले.

डोंबिवली मध्यवर्ती शाखेला देखील उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गट महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना त्यांनी गद्दारांचे दिल्लीचे रस्ते बंद झाले. राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने निकाल दिला, पण त्यांनी जनतेत येऊन शिवसेना कोणाची हे विचारण्याची हिंमत दाखवावी, तुम्हाला कळेल शिवसेना कोणाची आहे.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, कडेकोट बंदोबस्तात बसून शिवसेना कोणाची याचा निर्णय होऊ शकत नाही. या शब्दात त्यांनी नार्वेकर यांना सुनावले. थापा मारून लोकांची फसवणूक करणारी लोक आज मंदिरे साफ करतात चांगला आहे. त्यांना थोडं तरी पुण्य लागेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर चे नाव आम्ही देण्याचे काम केले. मात्र तुम्ही आता विमानतळाला दिवा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीनगर विमानतळ, असे नाव देणार का? हे आम्हाला बघायचे आहे, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT