Kalyan Missing Corporator Ramesh Tike Death Update News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : दबावामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यू झाल्याचा आरोप; कल्याण पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Kalyan Missing Corporator Ramesh Tike Death Update News : कल्याणमधील बेपत्ता नगरसेवक प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ACP कल्याणी घेटेंनी चौकशीबाबत सविस्तर माहिती दिली.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये बेपत्ता नगरसेवक प्रकरणावरून राजकीय वाद वाढला

  • पोस्टर लावल्याप्रकरणी पोलिसांत अदखलपात्र तक्रार नोंद

  • पोलिसांकडून दोन स्वतंत्र चौकशा सुरू

  • मृत्यूबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पूर्वेत काल बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले. यानंतर ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिके यांचा मृत्यू झाल्यानंतर हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश मात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने थेट प्रशासनावर गंभीर आरोप केले. यानंतर बेपत्ता नगरसेवक प्रकरणात सुरू असलेल्या आरोप–प्रत्यारोपांवर आता पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी घेटे यांनी या संपूर्ण प्रकरणातील तक्रारी आणि सुरू असलेल्या चौकशीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी, उमेश बळीराम म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा देवदर्शनासाठी बाहेर गेलेला असून तो त्यांच्या संपर्कात आहे. मात्र काही जणांनी त्याला बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीवरून काल ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे आणि अन्य दोन जणांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.आज याच प्रकरणात ठाकरे गटाकडून उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीविरोधात चौकशी करण्याचा अर्ज पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.

त्या अर्जानुसार स्वतंत्र चौकशीदेखील सुरू असल्याची माहिती ACP कल्याणी घेटे यांनी दिली. दरम्यान, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली नसून, सध्या फक्त नीरज दुबे यांच्या अर्जासंदर्भातील चौकशीच सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मनावरचा ताण अन् खर्च वाढेल, 5 राशींना आर्थिक चणचण भासेल; वाचा मंगळवार राशीभविष्य

आदिवासींच्या मागण्यांसाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयाल घालणार घेराव|VIDEO

Evening Snack Recipe : संध्याकाळी नाश्त्याला बनवा चटपटीत 5 पदार्थ

Maharashtra Live News Update: एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नाही; मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले यांच मोठ विधान

Long Mangalsutra Design: लग्नसराई किंवा फंक्शनसाठी ट्राय करा 'हे' ट्रेडिंग सुंदर मोठे मंगळसूत्र

SCROLL FOR NEXT