Shivsena-VBA
Shivsena-VBA Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena-VBA Alliance: ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा, आगामी निवडणुका एकत्र लढणार

साम टिव्ही ब्युरो

Shivsena-VBA Alliance: : गेल्या काही दिवसात ज्या युतीची चर्चा राज्यात सुरु होती, त्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे.

आज या ठिकाणी ऐतिहासिक घटना घडत आहे, याचे आपण साक्षीदार आहोत. अनेक दिवस चर्चा सुरु होती, अनेक बैठका झाल्या. जे संकट पुढे ठेपलं आहे यासाठी या युतीची घोषणा करत आहोत, असं म्हणत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी युती- उद्धव ठाकरे

आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी पुढील वाटचाल करण्यासाठी येथे आम्ही एकत्र येत आहोत. सध्या जे राजकारण सुरु आहे त्यावर आघात करण्यासाठी जे जीवाला जीव देणारे सहकारी आहेत ते एकत्र आले आहेत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

शिवसेना-वंचितची युती विजयी दिसणार आहे. हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या. गद्दारांना आणि बाकीच्यांना आव्हान आहे की एकदा निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला दिलं आहे.

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा - प्रकाश आंबेडकर

शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. आता आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आज ईडीच्यामार्फत पॉलिटिकल लीडर संपवण्याचा काम सुरु आहे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही.नरेंद्र मोदी यांचा देखील अंत होणार आहे, असंही आंबेडकर यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Himayatnagar : हिमायतनगरमध्ये भीषण पाणीटंचाई, 19 कोटी रुपयांच्या योजनेचा नुसताच गाजावाजा; महिला उपाेषणाच्या तयारीत

May Month Born Babies: मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात हे खास गुण; जाणून घ्या

Babara Ramdev News : बाबा रामदेव यांना धक्का, पतंजलीच्या 14 उत्पादनावर बंदी

Colon Cancer : कोलोरेक्टल कर्करोग कसा होतो? जाणून घ्या याच्या विविध टप्प्यांविषयी

Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा खास लूक पाहिलात का ?

SCROLL FOR NEXT