Maharashtra Political News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला पण...

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या नाराज आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Politics: अजित पवारांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठी-भेटी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारण ढवळून निघालं आहे. याचदरम्यान, शिंदे गटाच्या नाराज आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेमुळेही राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. आता पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण शिंदे गटातील नाराज आमदारांनी मातोश्रीवर संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Maharashtra News In Marathi)

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, शिंदे गटातील काही आमदार २७ जुलै रोजी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याच्या तयारीत होते. या आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

शिंदे गटाचे आमदार, मंत्री उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. उदय सामंत म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून गैरसमज पसवणारी बातमी पसरवली जात आहे. आमचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला त्यांना भेटायला जाणार होते'. (Uddhav Thackeray Latest News)

'आमचं जे उदिष्ठ होतं, ज्या हेतून आम्ही ४० आमदार बाहेर पडलो.कारण सत्तेत असताना ते कधी आम्हाला भेटले नाही. एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी मुख्यमंत्र्यासोबत दिवसभर होतो. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या १० आमदारांनी फोन केले. त्यातील सहा आमदार नंदनवन या बंगल्यावर भेटायलाही आले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT