CM Uddhav Thackeray On Political Crisis In Maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या आमदारांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणीही आपल्याला हिंदुत्व सोडलं असं सांगू नये असा इशारा दिला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार तेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरच आपण मुख्यमंत्रीपद सांभाळलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ( CM Uddhav Thackeray Live Updates)

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची? असा पक्ष उपस्थित झाला. या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधत उत्तरं दिलं. बाळासाहेबांनंतरही शिवसेने 66 आमदार एकहाती निवडून आणले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आकड्यांचा हवाला दिला. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कशाचाही अनुभव नसताना शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सांगितल्यावरच आपण मुख्यमंत्री पद सांभाळलं असल्याचं ठाकरे म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

इतकंच नाही तर, ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. मी आजच माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नको. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही.

मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पुरा करणारच, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT