Presidential Election 2022, BJP Latest News, Shiv Sena News Update, BJP Presidential Candidate. Saam Tv
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला देणार पाठिंबा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: शिवसेना (ShivSena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे. या निर्णयावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Presidential Election 2022)

आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. द्रोपती मुर्मु यांच्याबद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. प्रत्येकाचे मत आम्ही समजून घेतले आहे. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

देशात विरोधी पक्ष टिकला पाहिजे. यशवंत सिन्हा यांनाही आमच्या सद्भावना आहेत. लोक भावना काय आहे. यानुसार निर्णय घ्यावा लागतो. तसा आता हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आम्ही काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला असे निर्णय घेण्याची परंपरा आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (BJP Presidential Candidate)

शिवसेना पक्षप्रमुख कुठल्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. आम्ही त्यांना निर्णय घेण्यास सांगितला आहे. काल खासदारांच्या बैठकीतून संजय राऊत मध्येच निघून गेले होते, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मला सामनात काम होते, त्यामुळे बैठक संपल्यावर मी निघून गेलो. मी नाराज नाही असंही राऊत म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

SCROLL FOR NEXT