Pune : वारीनंतर वाढू शकते कोरोना रुग्णसंख्या; आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सर्व जिल्ह्यांना आदेश

Pune Corona News : याबाबत सर्व जिल्हांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
Eknath Shinde News, Covid 19 Pune Cases, Pandharpur Wari 2022, Ashadhi Wari 2022, Coronavirus Cases In Pune
Eknath Shinde News, Covid 19 Pune Cases, Pandharpur Wari 2022, Ashadhi Wari 2022, Coronavirus Cases In PuneSaamTV
Published On

सचिन जाधव

पुणे: पंढरपूरची वारी संपल्यानंतर आता वारकरी पुन्हा आपापल्या जिल्ह्यात परतत आहेत. पुण्यातील देहू याठिकाणीही वारकरी मुक्काम करतात. सध्या कोरोना (Corona) रुग्णांसख्या काही प्रमाणात वाढते आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. वारीहून परतलेल्या वारकऱ्यांमार्फत (Warkari) कोरानाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती राज्य शासनाला आहे. याबाबत सर्व जिल्हांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. (Ashadhi Wari 2022)

हे देखील पाहा -

राज्यातील सर्वात जास्त सक्रिय कोरोना रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात आठवडाभरात २८ टक्के कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुणे जिल्हात विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच मराठवाड्यातील जिल्ह्यात अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यातही वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. या सर्व जिल्ह्यांना आरोग्य विभागानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तीव्र ताप आणि गंभीर श्वसन विकार असल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करणे, चाचण्या करणे, स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवणे, व्हायरसमध्ये होणारे बदल (म्युटेशन) कळण्यासाठी डब्लूजीएसाठी नमुने आरोग्य विभागाला पाठवणे आणि एखाद्या भागात ठराविक रुग्णवाढ होत असेल तर राज्याच्या आरोग्य विभागाला कळवणे असे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.

राज्यात दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी झाली नव्हती. यावर्षी वारी झाली. लाखो भाविक पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला पोचले. तेथून पुढे हे वारकरी पुन्हा आपापल्या गावी जातील, त्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, अशी शक्यताही सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. पुण्यात मुंबईच्या तुलनेत उशिरा रुग्णांची संख्या वाढू लागली. मुंबईमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात ती वाढ अत्यल्प होती. आता मुंबईनंतर एक महिन्यांनी पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. (Coronavirus Cases In Pune)

Eknath Shinde News, Covid 19 Pune Cases, Pandharpur Wari 2022, Ashadhi Wari 2022, Coronavirus Cases In Pune
Petrol-Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

असे वाढले सक्रिय रुग्ण

तारीख मुंबई पुणे ठाणे

५ जुलै ६४०९ ५३३५ ४०३७

६ जुलै ५६०० ५७५० ३३८४

७ जुलै ४८७५ ६०७९ ३१३१

८ जुलै ४४२७ ६१९७ २८२९

९ जुलै ४११५ ६३७१ २५१२

१० जुलै ३७५३ ६४७० २२५९

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com