Uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच पोहचले विधान भवनात

शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी वर्षा निवासस्थान सोडले होते. शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस झाला. आजचा दिवसही वादळी ठरला. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान, आज विधिमंडळ पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले आहेत. काल सेना आमदारांची मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. त्यात अधिवेशनात आक्रमक होण्याच्या सूचना आमदारांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

आज महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होत असताना अधिवेशन, राज्यातील वेगवेगळे विषयांवर महाविकास आघाडीची रणनीती आखण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच विधान भवनात आले आहेत. उद्धव ठाकरे आताप पुन्हा ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये आले आहेत. गणेशोत्सवानंतर शिवसेनेचा राज्यभर दौरा सुरू करण्यात येणार आहे. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसेना जाहीर सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT