Shivsena Latest News Saam TV
मुंबई/पुणे

BMC Election 2022: ठाकरे गटाकडून मशालीचा जोरदार प्रचार; उटण्याच्या पाकीटातून घरोघरी करणार जनजागृती

Shivsena Latest News: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मशाल या निवडणूक चिन्हाचा संपूर्ण मुंबईत घराघरांत प्रचार करण्याचा विडा उचलला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर, मुंबई

BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून आपल्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी नवीन शक्कल लढवली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने उटण्याच्या पाकीटातून शिवसेना आपल्या मशाल या चिन्हाचा प्रचार करत आहे. (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray News)

गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेत दोन गट पडल्याने ही निवडणुक चुरशीची होणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट शिवसेनेत आहेत. ठाकरे गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं आहे, तर शिंदे गटाच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदाच मशाल चिन्हावर मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election 2022) लढवणार आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मशाल या निवडणूक चिन्हाचा संपूर्ण मुंबईत घराघरांत प्रचार करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी ठिकठिकाणी मशाल यात्रा काढण्यात येत असून दिवाळीच्या तोंडावर उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल निवडणूक चिन्हाविषयी जागृती करण्यात येणार आहे. प्रथमच उद्धव ठाकरे गट हा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे त्यामुळे पालिकेची निवडणूक देखील ठाकरे गटासाठी महत्वाची असून चुरशीची असणार आहे. जनतेला 'खरी शिवसेना आम्हीच' याबाबत आवाहन करण्यात येणार आहे, त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. (Tajya Batmya)

यासाठी विविध विभागातील कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ घरोघरी फिरुन मशाल या निवडणूक चिन्हाचा प्रचार करणार आहेत. सध्या पालिकेच्या निवडणुकीची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही. उमेदवार कोण हे ठरलेले नाही. प्रभाग पुनर्रचना, आरक्षण हे सगळेच विषय अडकलेले आहेत. मात्र या सगळ्या गोत्यात मतदारांना शिवसेना आपल्याकडे खेचण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. निवडणुक आयोगाने मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला दिल्याने या चिन्हाचा प्रचार शिवसैनिकांनी सुरू केला आहे. तर शिंदे गटातूनही आता हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT