Sushma Andhare Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare: मोठी बातमी! उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती बिघडली

Rohini Gudaghe

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

पोलीस भरती २०२२-२३ प्रकरणी महाराष्ट्र शासन योग्य निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या ३६ तासापासुन उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची तब्येत काहीशी बिघडली असून बीपी लो झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस भरतीमधील या विद्यार्थ्यांसाठी गृहविभाग का वेळ देत नाही? लाडकी बहिण योजना करतात, मग पोलीस भरतीच्या बहिणींबाबत का वेगळा न्याय? असा सवाल सुषमा अंधारे (Uddhav Thackeray Group Leader) यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सरकारला विचारला आहे. सुषमा अंधारे आझाद मैदानात उपोषण करत असताना त्यांची प्रकृती बिघडली आहे.

डिसेंबर २०२२ चा पोलीस भरतीचा जीआर असताना पोलीस भरती २०२४ ला सुरू केली. मुलांना वाढीव वय कारण सांगत भरतीपासून विन्मुख ठेवणे, हा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होत असल्याचं सुषमा अंधारे म्हणत (Sushma Andhare ) आहेत. त्यामुळेच अंधारे या विरोधात आझाद मैदानावर आंदोलन करत उपोषणाला बसल्या आहेत.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती बिघडल्याचं समोर (Police Recruitment) आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये, म्हणून अंधारे उपोषणाला बसल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस (Maharashtra Politics) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOCमध्ये नव्या सोनूची एन्ट्री, आहे तरी कोण?

Bigg Boss Grand Finale : 'आज की रात...' जान्हवी-निक्कीच्या दिलखेचक अदा, ग्रँड फिनालेला धुरळा उडणार

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

SCROLL FOR NEXT