Maharashtra Politics Uddhav Thackeray Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Lok Sabha Election : ठाकरे गटाचे १७ शिलेदार आखाड्यात; उमेवारांची पहिली यादी जाहीर; कुणाला पुन्हा मिळाली संधी?

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे.

Vishal Gangurde

lok sabha Latest news :

ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

खासदार संजय राऊत यांनी 'एक्स' सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. ' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, अशी पोस्ट करत राऊतांनी याविषयी माहिती दिली. ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपांचा तिढा मिटला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

लोकसभा उमेदवारांची यादी खालील प्रमाणे...

बुलडाणा - नरेंद्र खेडेकर

यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख

मावळ- संजोग वाघेरे पाटील

सांगली- चंद्रहार पाटील

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

धाराशीव - ओमराजे निंबाळकर

शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे

नाशिक - राजाभाऊ वाजे

रायगड - अनंत गीते

सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत

ठाणे - राजन विचारे

मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील

मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत

मुंबई वायव्य - अमोल कीर्तिकर

परभणी- संजय जाधव

दक्षिण मध्य - अनिल देसाई

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजा वाजे यांना उमेदवारी मिळाली आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. तर ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे बोललं जात आहे. यावरून काँग्रेस नेते सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आज दिल्लीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT