Uddhav Thackeray group and ncp sharad pawar mla andolan in mumbai for maratha reservation mantralaya  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Andolan: आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न; मराठा आमदारांची पोलिसांकडून धरपकड

Maratha Reservation Andolan: राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना मंत्रालय परिसरात मराठा आमदारांनी आंदोलन सुरू केलं होतं.

Satish Daud

Maratha Reservation Andolan

मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करत सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी आमदारांकडून मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या मराठा आमदारांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी आमदार आक्रोश करताना दिसून येत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची (Maratha Reservation) धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय मराठा आमदार एकत्रित आले आहेत. बुधवारी मराठा आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले.

या आंदोलनात आमदार राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे सहभागी झाले होते. (Latest Marathi News)

यावेळी आमदारांकडून घोषणाबाजी करत मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. तेव्हा पोलीस आणि आमदारांमध्ये झटापट झाली.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचे तात्काळ आधिवेशन बोलवावं, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पुर्ण कराव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT