uddhav thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं महाराष्ट्रातून नामोनिशान पुसून टाकू; उद्धव ठाकरेंची डरकाळी

Uddhav Thackeray speech in shiv sena melava : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मेळाव्यातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं महाराष्ट्रातून नामोनिशान पुसून टाकू, असं बोलत ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील षणमुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. एकीकडे महायुतीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाकरेंसमोर महायुतीचं मोठं आव्हान असणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची परीक्षा असणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सोहळ्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं नामोनिशान पुसू टाकू,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

तुमच्याशी काय बोलायचं हा प्रश्न मला पडला आहे. आता वातावरण जे आहे, ते वातावरण मला नाही वाटत की कुणाच्या नशिबात असेल. तसेच भाग्यात असं प्रेम लिहिलं असेल. खरंतर ही माझी पुण्याई नसून माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. ते तुमच्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. मी भाषण न करताही तुम्ही जयघोष करत आहात. हा जयघोष विरोधकांनी नुसता पाहिला तरी त्यांचे नॅपकीनसह सगळे कपडे ओले होतील.

आता त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं. त्यांनी माणसे फोडली, पक्ष फोडला, चिन्ह चोरली तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही. कारण त्यांना कल्पना नाही की शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलंय. आम्ही पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. त्यांचे विचार अंगात भिनवून कट्टर हिंदूनिष्ठ आणि महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत.

शिवसेना आजही तरूण असून नेहमी तरूणच राहणार. शिवसेनेचा पहिला मेळावा शीवतीर्थावर झाला, तेव्हा शिवाजी पार्क भरलं होतं. आता त्यांचा पैसा फेको तमाशा देखो सुरु आहे. आता चोरांचा बाजार आहे. तसं काही नव्हतं. त्यांनी एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मोठेपणा करू नये. त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले की एकदाच काय ते होऊ द्या. शिवाजी पार्क तुडुंब भरलं होतं. दाढी फुटली. दाढी खाजवतात, ते त्यावेळी कुठे असतील याची कल्पना नाही.

आज त्यांचे सगळीकडे बॅनर, पोस्टर लागलेत. त्या बॅनरवर शिवसेनाप्रमुखांचे फोटो आहेत. त्यांची कीव येते. बाप बदलतात. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत. त्याला आम्ही काय करू...आमच्याकडे आहेत घ्यायची ती घ्या.. किती पाहिजेत. भाजप असाच पक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT