बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली. याच मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) घेरण्याचा प्रयत्न केला. 'सर्व लोक गुजरातमधूनच का पकडले जातात?', असा सवालही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान ठाकरे गटाकडून आज मशाल गीत लाँच करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सर्व लोक गुजरातमधूनच का पकडले जातात. यामुळे गुजरातची बदनामी होत आहे. मी गुजरातला दोष देत नाही. पण आमचे गद्दार देखील गुजरातला पळाले होते. हे देखील गोळीबार करून गुजरातला पळाले. हे नेमकं काय प्रकरण आहे. ड्रग्ज उतरतात ते देखील गुजरातमध्येच. असं का होत आहे?' तसंच, 'गुजरातच्या लोकांनी आता विचार केला पाहिजे की गुजरातची बदनामी होत आहे. गुजरातमध्ये देखील भाजपविरोधात आंदोलनं होत आहेत. आता गुजरातमधूनच भाजप तडीपार होऊन जाईल.', असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायरिंग केले होते. सध्या या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरामधून अटक करण्यात आले. आरोपींना मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.