Uddhav Thackeray Speech Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Speech: टीनपाटांवर बूच घाला, अन्यथा...'; उद्धव ठाकरेंची वज्रमूठ सभेत नाव न घेता राणे कुटुंबीयांवर टीकास्त्र

Uddhav Thackeray Speech: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि राणे कुटुंबीयावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

Rashmi Puranik

Uddhav Thackeray Latest News: मुंबईच्या बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि राणे कुटुंबीयावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्याचं समर्थन करत नाही. मग तुमचे टीनपाट मला,आदित्य आणि कुटुंबाला शिव्या देतात, तेव्हा का बोलत नाही. तुमच्या टीनपाटावर बूच घाला. तुमची लोक वाटेल ते बोलणार, मग आमची लोक पण बोलणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. (Latest Marathi News)

मुंबईच्या बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' कर्नाटन निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मला ९१ वेळा शिव्या दिल्या'. मी शिव्या देण्याचे समर्थन करत नाही. मी तुमची टीनपाटे मला, आदित्य, कुटुंबाला शिव्या देतात, त्यांना का बोलत नाही. संजय राऊतही त्या भाषेत बोलत नाही. आम्ही मान ठेवतो'.

'टीनपाटांवर बूच घाला, तुमची लोक वाटेल ते बोलणार, मग आमची लोक पण बोलणार. रोज काहीही बोलणार आम्ही ऐकून घेणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

'मी सहा तारखेला बारसूमध्ये जाणार आहे. संध्याकाळी मग महाड सभेला जाणार आहे. माझ्या नावाने पत्र दाखवत आहेत. मी जागा सुचवली होती. त्यात रिफायनरीत पोलीस घुसवा लिहिले होते का? असा सवाल बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांनी केला.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' शरद पवारांच्या अमलाखाली गेलो अशी टीका होत होती. आज उदय सामंत हे शरद पवार यांना भेटून आले. तुम्ही केले तर चालते, आम्ही केलं तर चुकले. मला बाळासाहेब शिकवतात, हे शरद पवारांकडे सल्ला घ्यायला जातात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT