Uddhav Thackeray Saamana interview: सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आवाज कुणाचा पॉडकास्टमधून शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुलाखतीत विचारलेल्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली, असे म्हणणाऱ्यांनी आता राष्ट्रवादी फोडली, राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे भयंकर आरोप केले होते. त्या आरोपांचं काय झालं? त्या घोटाळ्यांच्या पैशांचं काय झालं?, असे सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.
राष्ट्रवादीसोबत जाणं ही भाजपची कूटनिती आहे की मेतकूट नीती आहे हे मला माहीत नाही. पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. नरक्षभक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांवर देखील निशाणा साधला. ज्यांनी या घडामोडी घडवल्या, त्यांचा घडा भरत आला आहे. सडलेली पाने ही पडलीच पाहिजे. ती पाने पडल्यानंतर नवीन अंकूर फुटतात. वृक्ष पुन्हा ताजातवाणा होतो. सडलेली पाने झडलेली आहेत आणि नवीन कोंम फुटलेले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (Shivsena) नाव आपल्याला पुन्हा मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केला. धनुष्यबाण की मशाल यापेक्षा शिवसेना हे नाव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. निवडणूक आयोगाचं काम निवडणूक चिन्ह देण्याचं असून पक्षाचं नाव बदलण्याचं किंवा नाव देण्याच नाही. आपण याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. लवकरच आपल्याला पुन्हा शिवसेना नाव मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.