Uddhav Thackeray and Arvind Kejriwal Pc
Uddhav Thackeray and Arvind Kejriwal Pc Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Press Conference: 'नातं जपण्यासाठी मातोश्री प्रसिद्ध', उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा

Satish Kengar

Uddhav Thackeray and Arvind Kejriwal PC: 'नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक केवळ राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्य केलं आहे.

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीत जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि इतर आम आदमी पक्षाचे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासोबत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या याचिकेवर निर्णय दिला. पण देशातून लोकशाही हटवू पाहणाऱ्यांच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.''  (Latest Marathi News)

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

या पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''२०१५ मध्ये दिल्लीत पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे सरकार आले, तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने एक अध्यादेश काढून आमचे सर्व अधिकार हिसकावून घेतले. या निर्णयाविरोधात गेली आठ वर्षे आम्ही न्यायालयात लढत होतो. न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधातच वटहुकूम काढत दिल्ली सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. केंद्राने थेट न्यायालयाचे निर्णयच धुडकावून लावले.''

ते म्हणाले की, ''भाजपने दिल्लीत अनेकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आमचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. एखाद्या राज्यातील सरकार पाडण्यासाठी यांचे तीन प्रकार आहेत. पहिला आमदार विकत घेणे. दुसरा, तपास यंत्रणांचा दबाव टाकणे आणि तिसरा अध्यादेश काढून राज्याचे अधिकार हिसकावून घेणे.'' (Viral Video News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT