Manasvi Choudhary
महिलांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
केवळ महागड्या उत्पादनांनी त्वचा सुधारत नाही तर तुम्ही नियमितपणे त्वचेची काळजी कशी घेता यावर देखील ते ठरते.
चेहऱ्यावर दिवसभर धूळ, मेकअप असल्याने ते केवळ फेसवॉश केल्याने निघत नाही तर तुम्ही खोबरेल तेलाने चेहरा स्वच्छ करा.
सकाळच्या वेळी व्हिटॅमिन-सी सीरम वापरणे हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण देते आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक देते.
तुम्ही घराबाहेर असा किंवा घरात, सनस्क्रीन लावा. उन्हामुळे अकाली सुरकुत्या पडतात. त्यामुळे दर ३ ते ४ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावावे.
त्वचा बाहेरून जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती आतून हायड्रेटेड असणे गरजेचे आहे. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. आहारात बदाम, अक्रोड आणि जवस यांसारख्या पदार्थांचा समावेश करा
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि त्वचेच्या प्रकारानुसार 'हायड्रेटिंग मॉइश्चरायझर' किंवा 'नाईट क्रीम' लावा. यामुळे सकाळी उठल्यावर त्वचा ताजी आणि टवटवीत दिसते.