uddhav thackeray and raj thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

Maharashtra Political News : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी बंडखोरांना रोखण्यासाठी जालीम उपाय योजलाय.... मात्र ठाकरे बंधू बंडखोरांची कशा प्रकारे कोंडी करणार आहेत... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Snehil Shivaji

शिवसेना मनसेच्या स्थापनेपासूनच बंडखोरी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर हे या पक्षांच्या पाचवीला पुजलं गेलंय. त्यात निवडणूका आल्या की अनेक शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी केलेली बंडखोरी हा एक वेगळा चर्चेचा विषय. आता ठाकरे ब्रँण्डसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी अनेक बैठका आणि अवातंर चर्चांनंतर या निवडणुकीत बंडखोरीचं हे ग्रहण मोडण्यासाठी जालिम उपाय शोधून बंडखोरांची कोंडी करण्याचं ठरवलंय. ठाकरेंची ही मोठी खेळी नेमकी काय आहे पाहूया..

ठाकरेंचा 'मास्टर प्लॅन'

अर्जाच्या आदल्या दिवशी युतीची घोषणा

बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी शेवटपर्यंत गुलदस्त्यात

उमेदवारांना थेट फोन करून 'एबी' फॉर्म देणार

शेवटच्या क्षणापर्यंत नाव जाहीर न करण्याची रणनीती

बंडखोरांना जुळवाजुळव करण्यास न देण्यासाठी प्लॅन

उमेदवार यादी जाहीर होताच उमेदवारांची नाराजी उफाळणार हे नित्याचंच. त्यात युती होणार असल्यानं दोन्ही पक्षांपैकी इच्छुकांची संख्या मोठीये. युतीनुसार एकालाच उमेदवारी मिळणार असल्यानं याच नाराजांची संख्या मोठी असणारेय. त्यामुळे याच नाराज इच्छुकांना विविध प्रलोभनं दाखवून राजकीय फोडाफोडी करण्यासाठी भाजपकडे असलेल्या प्रचंड मोठ्या यंत्रणेचा धोका लक्षात घेऊन दगाफटका होऊ नये म्हणून भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी हा प्लॅन आखलाय.

राज्यात ठाकरे ब्रँण्डसाठी एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेचं मैदान मारण्यासाठी ताकही फुकून पिण्याचं ठरवलंय. त्यामुळेच निवडणुकांच्या आधीच बंडखोरीच आव्हान रोखण्यात ठाकरे बंधूनां यश येत का की भाजप शिंदेगट ठाकरेंच्या बंडखोरांचा फायदा करुन घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT