भरत मोहळकर, साम टीव्ही
शिवसेनेच्या बंडाने महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाला अडीच वर्षेही पूर्ण झाली नाहीत. तोच आता पुन्हा तसाच भूकंप होणार असल्याचं दावा विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी केलाय.. यावेळी भूकंपाचा केंदर्बिंदू असणार आहे कोयना खोऱ्यातील दरे गाव.आणि याचे हादरे शिंदे गटाला बसतील असे संकेतच वडेट्टीवारांनी दिलेत.तर शिंदे गटाचे 20 आमदार उदय सामंतांसोबत असल्याचं सांगत संजय राऊतांनीही खळबळ उडवून दिलीय...
या भूकंपाच्या संकेताची दखल घेत दावोस मध्ये असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी राऊत आणि वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावत.. हे आपल्याला संपवण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय...
राज्यात महायुतीच्या विजयानंतर आधी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी आणि नंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी दबावतंत्र वापरलं होतं. त्याचं सारथ्यं उदय सामंत करत असल्याचं चित्र सामोर आलं होतं ..त्यामुळे सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या धुसफुशीमुळे भाजप उदय सामंतांना ताकद देण्याची शक्यता अधिक आहे.. त्यामुळे शिंदेंना डावलून शिवसेनेची कमान उदय सामंतांकडे सोपवली जाणार का? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.