Datta Dalvi case Saam Tv
मुंबई/पुणे

Datta Dalvi Update News: दत्ता दळवी शिवीगाळ प्रकरण; जामीन देण्यास भांडुप पोलिसांचा विरोध

Datta Dalvi case : मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी भांडुपमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालीय कोठडीत असलेल्या दळवी यांनी जामीनसाठी अर्ज केलाय. परंतु पोलिसांना त्याला विरोध केलाय.

Bharat Jadhav

(विनय म्हात्रे)

UBT leader Datta Dalvi Case :

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुंबईत माजी महापौर दत्ता दळवींनी जामीनचा अर्ज केलाय. दळवी यांच्या जामीन अर्जाला भाडुंप पोलिसांचा विरोध आहे. अटक आरोपीला जामीन मंजूर केल्याने गुन्ह्याचे तपासावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. (Latest News)

अर्जदार आरोपी दत्ता दळवीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याच्या उददेशाने आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील असे शब्द वापरून शिवीगाळ केली. अर्जदार आरोपीने केलेल्या गैरकृत्यामुळे महाराष्ट्रात दंगे करून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यातील फिर्यादी आणि अर्जदार आरोपी हे पूर्वी एकाच राजकीय पक्षाचे असून सद्यस्थितीत एकाच राजकीय पक्षाचे दोन गट झाले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फिर्यादी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटाचे आहेत. त्यामुळे अर्जदार आरोपीला जामिनावर मुक्त केले तर दोन्ही गटांमध्ये एकमेकांविषयी रोष निर्माण होईल. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दळवी यांना जामीन मंजूर केल्यास तपास कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गुन्ह्यातील साक्षीदार यांचेवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.

मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी भांडुपमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांना शिवीगाळ करत टीका केली होती. या टीकेनंतर माजी महापौर दत्ता दळवी यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती.

दत्ता दळवी यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दळवी यांच्या घरासमोरील त्यांच्या गाडीची चार ते पाच अज्ञातांनी तोडफोड केली आहे. दळवी यांच्या गाडीची तोडफोड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT