लोणावळ्यात फिरायला आलेल्या दोन तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

लोणावळ्यात फिरायला आलेल्या दोन तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू

बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाचा आज जन्मदिवस होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे

लोणावळा : लोणावळ्यात फिरायला आलेल्या तरुणांपैकी दोन जणांचा आज खाणीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. निगडी रुपीनगर भागातील हे तरुण आहेत. आकाश गुरव व वीरेंद्र त्रिपाठी अशी या खाणीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव याचा आज वाढदिवस होता. Two youths drowned in a mine while swimming in Lonavla

वाढदिवस साजरा करण्यासाठी करण्यासाठी आकाश आणि त्याचे इतर चार मित्र त्यांच्या तीन मोटरसायकलवरून लोणावळ्यात आले होते. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ते सर्व लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज समोर असलेल्या एका दगडाच्या खाणी कडे गेले होते. त्याठिकाणी गेल्यावर आकाश सोबत आलेले त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.

यावेळी आकाश आणि विरेंद्रही पोहण्यासाठी उतरला होता. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना खोल पाण्यात उतरू नका असे सांगूनही त्यांनी त्यांचे ऐकले नाही. आणि ते खोल पाण्यात गेले असता पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. युवकांनी अतिउत्साहीपणा दाखवून अश्या पद्धतीने मृत्यू ओढावून घेणे दुर्दैवी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT