Drown, lonavala, birthday, nagar, shikrapur saam tv
मुंबई/पुणे

मुलाच्या वाढदिवसादिवशी कुटुंबावर काेसळला डाेंगर; स्विमिंग टॅंकमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू

या घटनेमुळं कुटुंबास माेठा धक्का बसला आहे.

दिलीप कांबळे

लोणावळा : लोणावळ्यात (lonavala) लहान मुलांचा वाढदिवस (birthday) साजरा करण्यासाठी आलेल्या शिक्रापूर येथील एका कुटुंबावर मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच कोसळला दुःखाचा डोंगर. दोन वर्षांच्या जुळ्या लहान मुलांपैकी एकाचा लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील पुष्षा व्हिला मधील जलतरण तलावात नुकताच बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवबा अखिल पवार (shivba pawar) (शिक्रापूर, शिरूर, मूळ राहणार पाथर्डी, नगर) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. (lonavala latest marathi news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अखिल पवार हे कुटुंबीयासह त्यांच्या दोन‌ वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आले होते. त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील तुंगार्लीतील गोल्ड व्हॅली येथील पुष्पा व्हिला बुक केले होते. याठिकाणी आल्यावर पवार कुटूंबीय व्हिला मधील हॉलमध्ये मुलांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करत होते. यावेळी शिवबा हा खेळता खेळता बाहेर आणि बाहेर असलेल्या जलतरण तलावात पडून बुडाला.

काही वेळानंतर शिवबा जवळ कोठेच दिसत नाही. म्हणून त्याच्या आई वडीलांसह (parents) नातेवाईकांनी त्याची शोधा शोध सुरू केली. पण ताे सापडला नाही. अखेर ते जलतरण तलावा जवळ आले असता त्यांना शिवबा जलतरण तलावाच्या पाण्यात आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात उतरुन शिवबाला बाहेर काढलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT