Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, saam tv
मुंबई/पुणे

Shivsena Anniversary: शिवसेनेच्या इतिहासात 2 वर्धापन दिन साजरे होणार; सभेचं मैदान कोण गाजवणार? शिंदे की ठाकरे?

Shivsena Vardhapan Din: शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा सेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Mumbai News: शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा सेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. शिंदेंच्या बंडानंतर आज ठाकरे गटाचा वर्धापन दिन ष्णमुखानंद सभागृहात तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मोठे बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. तर या सोहळ्यात नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि ष्णमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

शिवसेना फुटीनंतर आता मुंबईत दोन वर्धापन सोहळे पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईत गेल्या काही दिवसांत दोन्ही गटाच्या स्वतंत्र्य बैठकी झाल्या होत्या. ठाकरे गटाकडून पक्षाच्या वर्धापन दिनाची जबाबदारी ही मुंबईतील विभागप्रमुखांकडे सोपवण्यात आली होती.

वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करा : उद्धव ठाकरे

तर शिंदे गटाच्या सर्व आमदार,मंत्री त्याचबरोबर प्रतिनिधींनी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले होते.

दोन्ही गटांकडून जोरादार बॅनरबाजी

दरम्यान, आज दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही गटांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. कलानगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली असून वाघांचा वारसा, अशा आशयाचे मोठे होर्डिंग लावल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दसरा मेळाव्यानंतर दोन वर्धापन दिन

गेल्या वर्षी दोन्ही गटांचा मुंबईत दसरा मेळावा पार पडला होता. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडला. तर शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर पार पडला होता. दसरा मेळाव्यानुसार यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन देखील दोन ठिकाणी पार पडणार आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार बॅनरबाजी देखील केल्याचे दिसत आहे.

कुणाचा वर्धापन दिन सोहळा कुठे?

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा पक्षाचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहे. ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. या सोहळ्यातील सभेला उद्धव ठाकरे ७ वाजता संबोधित करणार आहे. तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. दोन्ही गटाच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

Abdul Sattar News : उद्धव ठाकरेंच्या मनावर परिणाम झालाय, अब्दुल सत्तार यांचा पलटवार

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

SCROLL FOR NEXT