Supriya Sule Statement: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे नेते भावूक झाले आहेत. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा नेते तसेच पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. (Breaking Marathi News)
दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) अजूनही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं कळतंय. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत आपण या निर्णयाचा फेरविचार करू, असं शरद पवार यांनी म्हटलं असल्याचं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत चर्चा रंगली असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. (Latest Marathi News)
अगदी आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला होता. येत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होतील, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यातील एक स्फोट महाराष्ट्रात आणि दुसरा स्फोट दिल्लीत होईल, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या दोन वक्तव्यातील एक वक्तव्य खरं ठरलं आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचा हा निर्णय अंतिम आहे की नाही, हे अद्याप कळलेलं नाही, मात्र ते आपल्या विधानावर ठाम असल्याची माहिती आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, आता दुसरा राजकीय धमाका काय होऊ शकतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता दुसरा राजकीय स्फोट काय असू शकतो? दुसरा राजकीय धडाका दिल्लीतून येईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. शिवसेनेच्या या १६ बंडखोर आमदारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.