Navi Mumbai  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : इंजेक्शन देताच १० मिनिटात दोन रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप; कोपरखैरणेमधील खळबळजनक घटना

Two Patients Dies Due to Injection : डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai :

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चुकीच्या इजेक्शनमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. विजय मोरे आणि मनीषा पठारे अशी मृत रुग्णांची नावे आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंजेक्शन दिल्यानंतर 10 मिनिटातच दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिली आहे. (Latest Marathi News)

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा पठारे यांच्या पोटात गाठ तयार झाली होती. त्याचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना रुग्णालयात ४ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं त्याच संध्याकाळी ऑपरेशन देखील झालं आणि त्यांची तब्येत देखील ठीक होती. काही वेळाने नर्सने मनिषा एक इंजेक्शन दिलं. त्यानंतर मनिषा यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना उलटी झाली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

विजय मोरे यांच्यासोबत देखील असंच काहीसं झालं. विजय हे देखील ४ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच दिवशी त्यांचं फीशरचं ऑपरेशन झालं. विजय यांना देखील एक इंजेक्शन देण्यात आलं होतं. इंजेक्शन दिल्यानंतर विजय घाबरल्यासारखं करु लागले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

अशारीतीने रुग्णांच्या जाण्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. नेमकं कोणत्या इंजेक्शनमुळे दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी याबाबत संताव व्यक्त करत डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT