Mumbai Latest Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: संतापजनक! मुंबईत पोटच्या मुलींवर अत्याचार; दोन नराधम पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Latest Crime News: मुंबईतून माणुकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे.

सूरज सावंत

Mumbai Latest Crime News

मुंबईतून माणुकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचा संतापजक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एक घटना जोगेश्वरी पश्चिम आणि दुसरी घटना बडी मस्जिद परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधम बापांना अटक केली असून त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथे राहणाऱ्या एका नराधम बापाने जीवे मारण्याची धमकी देत आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिसांनी (Police) वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दुसरीकडे जोगेश्वरीच्या बड्डी मस्जिद परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय नराधम बापाने आपल्या ११ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केलं. मुलगी झोपेत असताना बापाने तिच्यावर अत्याचार (Crime News) केल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांत दिली.

त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी ५२ वर्षीय वडिलांवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या दोन्ही मुलीची शासकीय रुग्णालयात वैद्ययिक तपासणी करण्यात आली असून या घटनेचा अधिकचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT