Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबईत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, चाैघांना अटक; फसवणूक झालेल्यांनी पाेलीसांत तक्रार द्यावी

ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती गोळा करून फसवणुक केली जात आहे.

Siddharth Latkar

- संजय गडदे

Mumbai Crime News : पवई येथील बोगस कॉल सेंटरवर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकत चाैघांना अटक केली आहे. संबंधित कॉल सेंटरच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय पाेलीसांना आहे. या प्रकरणी पाेलीस अन्य संशयितांचा शोध घेताहेत. (Maharashtra News)

मुंबईच्या पवई आणि साकी विहार परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी या बोगस कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून कारवाई करून चार जणांना अटक केली आहे तर काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार या कारवाईत आदिल निसार अहमद सयद, मार्शल सेल्वराज, अस्फाज अली मोसीन अली, अविनाश गोपाळ मुदलीयार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ लॅपटाप हस्तगत केले आहेत. त्याची अंदाजे किंमत ४ लाख २५ हजार रूपये आहे. त्याशिवाय पाेलीसांनी साठ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन देखील हस्तगत केले आहेत.

याप्रकरणी आता पवई पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४७१, २०१, १२०(ब) भादविसं, सह कलम ६६ (क) (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ नुसार गुन्हा नोंद करून घेतला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला आहे.

कसे चालायचे फसवणुकीचे काम?

अवैधरित चालणाऱ्या कॉल सेन्टरमधुन ॲमेझोन कंपनीतर्फे कॅनेडीयन नागरिक बोलत असल्याचे सांगितले जात असे. तुम्हाला ॲमेझॉन कंपनीतर्फे आयफोन 14 दिला जाणार आहे परंतु तुमच्या ॲमेझॉन आयडेंटिटीची चोरी झाली असून त्याचा ड्रग्स व्यापार आणि मनी लॉन्ड्रीग साठी उपयोग केला जात आहे असे सांगून ग्राहकाच्या बँक अकाउंटची माहिती गोळा करून त्यांच्या अकाऊंट मध्ये असलेले डॉलर हे त्यांना लोकल बिट कॉईन व एटीएम मशीनमध्ये जावून क्यु. आर. कोडदारे त्यांच्याकडुन ऑनलाईन बिट कॉईन व डॉलर खरूपात रक्कम प्राप्त करून त्यांची ऑनलाईन फसवणुक केली जात असे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT