Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; २ जण जागीच ठार

या अपघातात वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर किवळे- देहूरोड जवळ भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने चिरडले. अपघातात वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती.

मिळालेली माहिती अशी, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू (Death) झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या कुटुंबाची ओळख पटवण्यात येत आहे.

देहूरोड किवळे ब्रिजवर दुचाकीला कंटेनर ने मागून धडक दिली. यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी आहेत, जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात जखमी झालेले पुण्यातील रामनगर वारजे माळवाडी येथील चौधरी कुटुंब आहेत. सुरेश चौधरी मोटरसायकलवरून पत्नी ममता आणि मुलगी दिव्या यांच्यासह प्रवास करत होते.

यावेळी भरधाव कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. यात ममता चौधरी आणि दिव्या चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातग्रस्त चौधरी कुटुंब राजस्थानी आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT