विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!
विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली! SaamTvNews
मुंबई/पुणे

विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातील जय गणेश साम्राज्य चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर चे दार उघडे असल्याने एका बारा वर्षाच्या भिक्षेकरी मुलीला जोरदार विजेचा धक्का लागलाय.

हे देखील पहा :

या विजेच्या धक्क्यात मुलगी थोडक्यात बचावली आहे. इलेक्ट्रिक ट्रांसफार्मरचे दार उघडे असल्याने एका भिक्षेकरी मुलीने आपले कपडे भिजू नये म्हणून ट्रांसफार्मरच्या दाराच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याच वेळी ट्रांसफार्मर चा विजेचा धक्का लागून हि बारा वर्षाची भिक्षेकरी मुलगी गंभीर भाजली आहे. स्थानिक नागरिकांनी भिक्षेकरी मुलीला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, या घटनेने महावितरणच्या उघड्या असलेल्या ट्रांसफार्मर च्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

SCROLL FOR NEXT