Nawab Malik Vs BJP: BJP Leaders Tweets Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik Vs BJP: मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते काय म्हणाले? पहा भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पहाटे ६ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी १ तास चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ०७:३० वाजता नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी मलिकांना ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय. नबाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यानंंतर महाविकास आघाडीने भाजप नेत्यांवर टिका केली तर भाजपने ईडीच्या कारवाईचं समर्थन केलंय. (BJP Leaders Slams Nawab Malik)

हे देखील वाचा -

मोहित कंबोज-भारतीय

मंत्री नवाब मलिक यांंना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचल्याचं दिसून आलं. भाजप नेते मोहित कंबोज यांनी जय श्री राम ! ट्विट केलं तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये "सुबह 5 बजे उठा के ले के जाते हैं, इंसान खुद नहीं जाता!" असं लिहिलं आणि एक टिफीन बॉक्सचा फोटोही शेयर केला.

राम कदम
याबाबत भाजप आमदार राम कदम म्हणाले की, हजारो नागरिकांना बॉम्बस्फोटात मारणाऱ्या दाऊदच्या साथीदाराची जमीन तुम्ही कवडीमोल भावात घेता, ईडीची कारवाई झाल्यानंतर सुडाचं राजकारण असं म्हणता. अशी टीका त्यांनी केली.

डॉ. अनिल बोंडे

नवाबचा कबाब झाला आहे, जसं करावं तसं भरावंच लागणार आहे. राजकारणाचा बुरखा ओढून पांढरपेशासारखं दाखवलं जात होता. हे डॉन आहेत. यांची गुन्हेगारी लपवण्यासाठी त्यांनी राजकारणाचा बुरखा ओढला आहे. ईडीमध्ये सगळे आयएस-आयपीस अधिकारी असतात, ते सगळी शहानिशा करुनच ते कारवाई करतात. त्यामुळे इक्बाल कासकरशी संबंध नसेल तर मलिकांना घाबरु नये, असेल तर अनिल देशमुखांच्या शेजारी बसण्याची तयारी ठेवावी.

अतुल भातखळकर

मलिकांच्या अटकेबाबत मलिक म्हणाले की, "मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'हे होणारच होते', असे उसासे सोडलेत. दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही ? नसेल तर त्याची काही विशेष करणे आहेत का? असं म्हणत भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला... असं ट्विट त्यांनी केलं आहे.

आशिष शेलार

भाजप आमदाप आशिष शेलार यांनी ट्विट केलं की, "मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!"

भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे समनव्यक तुषार भोसले यांनीदेखील "अब नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा ‼️" #सत्यमेवजयते असं ट्विट केलंय.

एकुणच पाहता मंत्री नवाब मलिकांना ताब्यात घेतल्याप्रकरणी एकीकडे महाविकास आघाडीचे नेते याला तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपवर करत आहे तर, भाजप ईडीने केलेल्या कारवाईचं पुर्णतः समर्थन करत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT