Tulsi lake  ANI Twitter
मुंबई/पुणे

मुंबईकरांची पाणी चिंता मिटली ! शहराला पाणी पुरवठा करणारा तिसरा तलाव ओसंडून वाहू लागला

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

मुंबई : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यात मुंबईत महापालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज सायंकाळी ५:४५ वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणारा तिसरा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटली. (Mumbai News In Marathi )

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या २ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

८०४ कोटी लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये देखील १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर वर्ष २०२० मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये १,१३,८०९.७० कोटी लीटर (११,३८,०९७ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ७८.६३ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.८१ टक्के अर्थात १५१६९.९० कोटी लीटर (१,५१,६९९ दशलक्ष लीटर), मोडक-सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२८९२.५० कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी असून आज हा तलाव १०० टक्के भरलेला आहे.

तर तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ९९.१८ टक्के अर्थात १४,३८८.७० कोटी लीटर (१,४३,८८७ दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या ८१.५५ टक्के अर्थात १५,७८१.८० कोटी लीटर (१,५७,८१८ दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ७३.८४ टक्के अर्थात ५२,९४९.४० कोटी लीटर (५,२९,४९४ दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या ६६.१२ टक्के अर्थात १८३१.३० कोटी लीटर (१८,३१३ दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावांमध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT