nalasopara news, nigerian, tulinj police saam tv
मुंबई/पुणे

Nalasopara News : माजी पोलिस अधिका-यासह 6 नायजेरियन नागरिकांवर तुळिंज पोलिसांची कारवाई

पाेलिस सातत्याने परदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांची तपासणी करीत असतात.

चेतन इंगळे

Nalasopara News : नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात बेकायदेशिर रित्या राहणाऱ्या ६ नायजेरियन नागरिकांना नालासोपारा तुळिंज पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी मध्यरात्री दाेनच्या सुमारास ही कारवाई केली. (Maharashtra News)

तपासणी माेहिम

तुळिंज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व नागरिक विद्यार्थी व्हिसा घेऊन भारतात येतात. व्हिसा संपल्यानंतर पोलिसांना कल्पना न देता बेकायदेशीररित्या भारतात राहतात. पाेलिस सातत्याने परदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांची तपासणी करीत असते.

मध्यरात्री टाकला छापा

नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात ६ नायजेरियन नागरिक बेकायदेशिर राहत असल्याचे पाेलिसांना समजले. त्यानूसार पूर्व प्रगती नगर परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास पाेलिसांच्या पथकाने एका इमारतीत छापा टाकला. तेथून सहा नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले.

संशयितांत माजी पाेलिस अधिका-याचा समावेश

या कारवाईत घर मालक व नायजेरियन नागरिकांना घर भाड्याने देणारे एजंट यांच्यावर देखील पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका माजी पोलीस अधिकारी याचा समावेश असल्याची माहिती तुळिंज पोलीसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT