Pune FDA Action saam tv
मुंबई/पुणे

Pune FDA Action: तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात मोठी कारवाई, हॉटेलनंतर थेट खाऊ गल्लीवर छापा, 8 दुकानं सील

Pune Food Safety Drive: पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत FDA ची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. १७ दुकानांची तपासणी करताना ८ दुकानांना बंदच्या नोटिसा देण्यात आल्या. सहा अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई झाली.

Surabhi Jayashree Jagdish

अक्षय बडवे, प्रतिनिधी

पुण्यातील खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थांच्या दर्जावर आणि स्वच्छतेवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) लक्ष केंद्रित केलंय. जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत FDA कडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी एकूण १७ अन्न खाण्याच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील जंगली महाराज मंदिरासमोर तसंच एन.सी.आर. हॉटेल परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. तपासणीदरम्यान ८ दुकानांकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना किंवा नोंदणी नसल्याचं आढळलं. त्यामुळे या आठही दुकानांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसंच प्रत्येक आस्थापनावर ३० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आलीये.

या दुकानांवर केली कारवाई

यामध्ये श्रीनाथ पिझ्झा अँड सँडविचेस, राज चायनीज फास्ट फूड, हिंदवी स्वराज्य, एव्हरेस्ट मोमोज, जय मल्हार भुर्जी सेंटर, शोरमा सेंटर, उत्कर्ष मंडळ लव्ह ज्यूस पॉईंट, साई ज्यूस, मिल्कशेक अँड सरबत सेंटर यांच्यावर कारवाई करण्यात आलीये.

याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुमित कुमार, जे. एम. वडापाव स्नॅक्स, हॅप्पी फॅमिली रेस्टॉरंट, श्री सद्गुरू हिंदवी स्वराज्य स्पेशल तुपातील साबुदाणा वडे, जे. एम. पावभाजी कॉर्नर आणि श्री कृष्णा दिल्ली चाट अँड पाणीपुरी सेंटर या दुकानांवरही कारवाई करण्यात आलीये. त्याचप्रमाणे सहा जणांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवर कारवाई

दरम्यान, यापूर्वीही FDA ने पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील फर्ग्युसन कॉलेज (एफ.सी.) रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवर कारवाई केली होती. अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्याचे गंभीर उल्लंघन आढळल्याने या दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विश्वास नांगरे पाटील यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून महिला डॉक्टरला ३० लाखांचा गंडा

Breaking News : मोठी बातमी! भाजपकडून शिंदेसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

Pune Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन! गोव्यातून पुण्यात आले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Health Tips : जेवणानंतर कामात लक्ष लागत नाही? सतत झोप येण्यामागे असू शकतात ही ५ कारणे

Night BP : रात्री झोपताना अचानक वाढतो रक्तदाब? 'या' ५ सवयी ठरतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT