Trupti Desai On Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

Baramati News: सुप्रिया सुळेंच्या विरोधात तृप्ती देसाई मैदानात, लोकसभेसाठी भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर असल्याचा दावा

Trupti Desai On Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या विरोधात तृप्ती देसाई मैदानात, लोकसभेसाठी भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर असल्याचा दावा

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन बनसोडे

Trupti Desai On Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यास असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. सुळे या विकास आघाडीच्या उमेदवार असतील तर भाजपने माझ्यासारख्या सक्षम महिलेला उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये. भाजपसह काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी फोन आल्याचा गौप्यस्फोट तृप्ती देसाई यांनी केलाय. शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या असं म्हणाल्या आहेत.

राज्यातील राजकारण सध्या कोणत्या दिशेने चालल आहे? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थितीत केलाय. अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले तर दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात आमच्या राष्ट्रवादीत फुट पडली नाही. मात्र जनतेच्या पायात बुट आहे, तो बुट जर मतांद्वारे तुम्हाला पडला की, मग तुम्हाला कळेल लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला, तुमचे भाऊ आहेत तर तुम्ही त्याच्या बरोबर भाजपमध्ये जा असा घणाघात तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलाय.

देसाई म्हणाल्या की, सुप्रिया सुळे तीन वेळा बारामतीतून खासदार झाल्या आहेत. मला वाटलं होतं, यावेळी त्या राष्ट्रवादीच्या एखाद्या कार्यकर्त्याला बारामतीतून संधी देतील मात्र सुप्रिया सुळे स्वतःच तयारी करतायेत. त्यांच्या मतदार संघात अनेक कामे झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य नाही. यावेळी त्यांच्या विरोधात मी बारामतीमधून लोकसभा लढविणार आहे. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे जर महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील तर भारतीय जनता पक्षाकडून मी उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचं देसाई यांनी म्हंटलंय.

भाजपने माझ्या सारख्या कार्यकर्तीला उमेदवारी दिली तर नक्कीच बारामतीत बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. बारामतीसाठी भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून मला फोन आले असल्याचा गौप्यस्फोट देसाई यांनी केलाय. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मी पुढील चर्चा केलेली नाही. सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील, तर मी भाजपाची आणि त्या भाजपात गेल्या तर मी महाविकास आघाडीची उमेदवार असणार, असा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT