Pimpri Chinchwad News Saam Tv
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवडकरांना महापालिकेचा मोठा धक्का, पालिका रुग्णालयांमध्ये पेशंटवरील उपचार महागणार

पिंपरी चिंचवड महापालिकेला कोट्यावधी रुपयाचे कर रूपाने उत्पन्न मिळत असताना, आजारी लोकांकडून महापालिका का अतिरिक्त वसुली करत आहे?

गोपाळ मोटघरे

पुणे - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी - चिंचवड महापालिकेने आता महापालिकेच्या रुग्णालयात (Hospital) ही मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचे धोरण तयार केल आहे. पिंपरी - चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेला कोट्यावधीचा कर रूपाने उत्पन्न मिळत आहे तरी, देखील महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचं धोरण तयार करून सर्वसामान्य पिंपरीकराचे आर्थिक कंबरड मोडल आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 8 मुख्य रुग्णालय आणि 29 दवाखान्यांमध्ये ही दरवाढ करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयाचे दर आणि महापालिका रुग्णालयाचे दर हे समान असावेत असा आदेश 2017 मध्ये राज्य शासनाने काढला होता. त्या आदेशाच जवळपास पाच वर्षानंतर अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील करत आहेत.

राजेश पाटील यांनी वैद्यकीय सेवा मध्ये केलेल्या दरवाढीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला जवळपास दोन कोटी रुपयांचा उत्पन्न मिळणार आहे. आधीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयामध्ये काही शस्त्रक्रिया करणार करिता पुरेशी यंत्र सामूग्री अजून देखील उपलब्ध नाही आहे. त्यात रुग्णालयात दरवाढ करून, महापालिकेने लोकांच्या आजारावर मलम चोळण्याचं काम केलं आहे. तर महापालिकेतील वैद्यकीय विभागातील अधिकारी यावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

हे देखील पाहा -

आम्ही फक्त दरवाढीचे धोरण तयार केलं असून, अजून दरवाढ लागू करण्यात आली नाही असं महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफने यांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने रुग्णालयात दरवाढ कशाप्रकारे केली ते आपण जाणून घेऊया...

जुने दर नवे दर

केस पेपर १० रुपये . २० रुपये

आय सी यू १७० रूपये.प्रती दीन ४०० रुपये

साइड रूम ९० रुपये प्रती दीन. १५० रुपये

सेमी प्रायव्हेट रूम ९० रुपये प्रती दीन. ३०० रुपये

ड्रेसिग चार्जेस १० रुपये. २० रूपये

एक्स रे चार्जेस ४० रूपये. १२० रुपये

पिंपरी चिंचवड महापालिकेला कोट्यावधी रुपयाचे कर रूपाने उत्पन्न मिळत असताना, आजारी लोकांकडून महापालिका का अतिरिक्त वसुली करत आहे ? असा सवाल पिंपरी चिंचवडकर नागरिक विचारत आहेत.

सध्या पिंपरी - चिंचवड महापालिकेवर प्रशासक म्हणून राजेश पाटील हे कारभार पाहत आहेत. पिंपरी - चिंचवड शहरात काही वर्षासाठी प्रशासक म्हणून आलेले राजेश पाटील सर्वसामान्य पिंपरी चिंचवड नागरिकांवर कायम करिता दरवाढ लागू करण्याचं धोरण तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT