Nitesh Rane, Uddhav Thackeray , Pune News, bund garden police station, Transgender saam tv
मुंबई/पुणे

Pune Transgender Andolan: हाय हाय...हाय हाय.. नितेश राणे हाय हाय..., 'त्या' शब्दावरुन तृतीयपंथीयांचा पुण्यात रास्ता राेकाे (पाहा व्हिडिओ)

Transgender Andolan In Pune : काही आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पुणे पोलिसांनी नकार दिल्याचा आराेप करीत आज (बुधवार) तृतीयपंथी यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्यासमोर (bund garden pune) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता राेकाे आंदोलन छेडले. या आंदाेलनातील काही आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) तृतीयपंथी समाजाचा अवमान केल्याची तक्रार पोलीस घेत नाहीत असे सांगत तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्यासमोर आंबेडकर चौकात हे बेमुदत रास्ताे राेकाे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदाेलन काळात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या पदाधिका-यांना, कार्यकर्त्यांना केली.

परंतु तृतीयपंथी यांनी आंदोलनावर (aandolan) ठाम भूमिका घेतली. दरम्यान काही आंदाेलनकर्त्यांनी पाेलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी काहींनी त्यास प्रतिकार केला परंतु पाेलिसांनी बळाचा वापर करुन आंदाेलकांना पाेलिस ठाण्यात नेले.

नितेश राणे म्हणाले हाेते...

आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंवर टीका करताना हिजड्यांचा प्रमुख उद्धव ठाकरे आहे असे म्हटले हाेते. सगळी सरकारी यंत्रणा बाजूला ठेव मग बघू. आमच्या नेत्यांवर टीका बंद नाही केली तर तुझे कपडे टरा टरा फाडणार असा इशारा देखील राणेंनी दिला. आमचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका केली तर तुमचे कपडे कसे फाडायचे हे मला माहित आहे असेही राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात येणार १४ लाख रुपये, वाचा कॅलक्युलेशन

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT