मुंबई: 100 कोटी वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. तसेच, त्यांच्यावर बदली घोटाळ्याचाही आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल सहा तास सीबीआयने संजय पांडे यांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला (Transfer Scam CBI Investigate Mumbai Commissioner Sanjay Pande For Six Years).
कथित बदली पोस्टिंग सीबीआयने मुंबईचे आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांचे जबाब नोंदवला आहे. संजय पांडे यांची काल सीबीआय कार्यालयात अधिकाऱ्यांनी 6 तास चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांना तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. ज्याची तक्रार स्वत: परमबीस सिंग यांनीही केली होती, अशी माहिती त्यांनी या जबाबात दिली.
सीबीआय (CBI) कथित बदली पोस्टिंग प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपी आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बदली घोटाळा प्रकरणात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची चाचपणी ही स्वत: संजय पांडे करत होते.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे ही चौकशी होणार होती. त्यावेळी परमबीर सिंग यांनी पांडेंची भेट घेतली होती, त्यावेळी पांडे यांचा फोन टॅप करण्यात आला होता. त्यानंतरच या सर्व प्रकरणाला वाचा फुटला.
या घटनेनंतर पांडे यांनी या समितीवरुन त्यांचं नाव काढावं अशी मागणी न्यायालयात केली होती. याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने सहा तास पांडे यांची चौकशी केलीये.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.