jogeshwari construction accident mumbai saam tv
मुंबई/पुणे

Tragic Incident : २२ वर्षीय तरुणी कामावर निघाली, वाटेतच मृत्यूनं गाठलं; इमारतीवरून सिमेंटची वीट डोक्यात पडली

Mumbai News : मुंबईतील जोगेश्वरीमध्ये दुर्दैवी घटना घडली. २२ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंटची वीट पडली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

Saam Tv

  • मुंबईतील जोगेश्वरीत हृदयद्रावक घटना

  • २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, कामावर जाताना अपघात

  • बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून वीट डोक्यावर पडली

  • बांधकाम व्यावसायिकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संजय गडदे, मुंबई | साम

नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या २२ वर्षीय तरुणीला वाटेतच मृत्यूने गाठले. मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडे ही घटना घडली. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंटची वीट खाली पडली. ती वीट या तरुणीच्या डोक्यावर पडली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेनं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

जोगेश्वरी पूर्वेकडे आज सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या गांधी नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंटची वीट २२ वर्षीय संस्कृती अमीन या तरुणीच्या डोक्यावर पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती अमीन ही तरुणी सकाळी कामावर जात होती. गांधी नगर येथे श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या इमारतीचं काम सुरू आहे. तिथून जात असताना संस्कृतीच्या डोक्यावर इमारतीवरून सिमेंटची वीट पडली. ती वीट तिच्या डोक्यावर आदळली. यात ती गंभीर जखमी झाली. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

संस्कृतीच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इमारतीच्या बांधकामस्थळी कुठल्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली गेली नसल्यानं ही घटना घडली, असा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पाळावयाच्या सुरक्षेविषयक नियमांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सुरक्षिततेचे नियम न पाळल्यानेच हा अपघात झाला आणि तरुणीला जीव गमवावा लागला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. बांधकाम सुरू असताना सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने अपघात वाढत असल्याने नागरिकांनी संबंधित विभागाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, इंजिनीअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, अभियंते आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संस्कृतीच्या वडिलांनी केल्याची माहिती आहे. ही घटना म्हणजे केवळ चूक नाही, तर गुन्हा आहे, निष्काळजीपणा आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT