mira bhayandar Saam tv
मुंबई/पुणे

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

mira bhayandar News : ऐन निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Saam Tv

मिरा–भाईंदर महापालिकेत घडली दुर्दैवी घटना

उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जावेद पठाण असे उमेदवाराचे नाव

मिरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. जावेद पठाण असे मृत उमेदवाराचे नाव आहे. ते ६६ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील उमेदवार जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. ते मंगळवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जावेद पठाण यांच्या मृत्यूने मिरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने राजकारणासहित सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तत्पूर्वी, काही इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म न मिळाल्याने पक्षाध्यक्ष, वरिष्ठांच्या दारावर पोहोचले. त्यांनी आक्रोश करत तिकीटांची मागणी केली. मात्र, तिकीट कापल्यामुळे काही जण पक्षातील वरिष्ठांशी भांडले. यावेळी काही इच्छुक उमेदवारांच्या महिला समर्थकांना चक्कर येण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी एका नेत्याच्या ज्येष्ठ समर्थकांना हृदयविराकाचा झटका आल्याचीही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT