Lohagad Fort Saam Tv
मुंबई/पुणे

Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना तरुणाचा मृत्यू, पाय घसरून ३५० फूट खोल दरीत पडला

Young trekker dies at Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावरून पडून ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रेकिंग करताना पाय घसरून ३५० फूट खोल दरीत पडला.

Priya More
  • लोहगड येथे ट्रेकिंगदरम्यान दुर्दैवी अपघात

  • तरुण ३५० फूट खोल दरीत कोसळला

  • ट्रेकिंग करत असताना तरुणाचा दरीत पडून मृत्यू

  • रेस्क्यू टीमने अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रेकिंग करताना हा तरुण पाय घसरून ३५० फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर आला होता. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून तब्बल ३५० फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीण पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करत तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात आले.

केतन विशाल आग्रवाल असे मृत तरुणाचे नाव होते. तो गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमसमोरील लोढा सोसायटीमध्ये राहत होता. मित्रांसोबत लोहगडावर फिरण्यासाठी आला असताना ही दुर्दैवी अपघात झाला. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. केतनच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT